मुंबई । वीरभूमी- 12-Aug, 2021, 12:00 AM
स्वातंत्र्य दिनापासून (रविवार दि. 15 ऑगस्टपासून) (Since Independence Day) राज्यातील दुकाने, उपहारगृह, मॉल रात्री 10 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे (Shops, restaurants and malls in the state are allowed to remain open till 10 pm). मात्र दुकानदारांना कोरोना प्रतिबंधक लसीरकण बंधनकारक करण्यात आले आहे. तर राज्यातील धार्मिक स्थळे, सिनेमागृह, मल्टीप्लेक्स मात्र बंद राहणार आहे (Religious places, cinemas and multiplexes in the state will remain closed).
याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मात्र कोरोना रुग्णांना 700 मेट्रिक टनापेक्षा जास्त ऑक्सिजनची गरज पडल्यास तात्काळ कडक लॉकडाऊन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे व्यावसायिकांना निर्बंधाचे स्वातंत्र मिळाले असले तरी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागणार्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
आज झालेल्या बैठकीत राज्यातील निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राज्यातील सर्व दुकाने, मॉल, उपहारगृहे यांची वेळ वाढवून रात्री 10 पर्यंत करण्यात आली आहे. मात्र यासाठी शासनाने काही अटी घातल्या आहेत.
उपहारगृहामध्ये क्षमतेच्या 50 टक्के आसन व जेवण मिळेपर्यंत मास्क वापरावा लागणार आहे. दुकाने उघडी ठेवण्यास सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. मात्र दुकानदार व तेथे काम करणारे यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालेले असावे. तसेच दुसरा डोस होऊन 14 दिवसाचा कालावधी झालेला असावा.
मॉलसाठीही वरील नियम करण्यात आला असून मॉलमध्ये येणार्या ग्राहकालाही लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखविणे आवश्यक केले आहे. विवाह सोहळ्यांना खुल्या जागेत 200 तर बंदिस्त जागेत 100 जणांना उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे. तसेच नियमाचे पालन होते की, नाही यासाठी तपासणीसाठी आलेल्या अधिकार्याला व्हिडीओ दाखविणे बंधनकारक करण्यात आले आहे.
राज्यातील धार्मिक स्थळे, सिनेमागृह, मल्टीप्लेक्स हे बंदच असणार आहे. तसेच गर्दी टाळण्यासाठी वाढदिवस, राजकीय व धार्मीक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रचार सभा, रॅली, मोर्चे यांच्यावरील निर्बंध कायम राहणार आहेत. मात्र निर्बंध शिथील केल्यानंतर बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणारा ऑक्सिजन हा 700 मेट्रिक टनापेक्षा जास्त लागत असल्यास संपूर्ण राज्यात कडक लॉकडाऊन जाहीर करण्याचा इशारा शासनाने दिला आहे.
यामुळे नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करावे, लसीकरणाचे दोन्ही डोस झाले नसतील तर ते पुर्ण करावेत. नियमित मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, असा आवाहन करण्यात आले आहे.
clOpRUjKbJt